व्हावे मोकळे ज्या मिठीत...

Started by Anil S.Raut, October 21, 2014, 09:23:50 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

तुटलेत ऋणानुबंध सगळेच आता इथले
मी एकटाच धागा, सारेच कापत सुटले!

प्रेमातही नाही राहिला तो विश्वास आता
गुंतलेले मन असे क्षणात रे का तुटले?

व्हावे मोकळे ज्या मिठीत दुःख मनाचे
ते प्रेमळ हातही आता नाहीत कुठे उरले!

मी जाणून आहे पसरलेत कैक हात पुढे
देणारे मागे, घेणारेच कसे पुढे सरसावले !

जाळण्यासाठी आज स्वार्थी या जगाला
तप्त सूर्य व्हायचे ,आहे आज मी ठरवले !

*अनिल सा.राऊत*
9890884228

shrikant.pohare




Anil S.Raut

मनापासुन धन्यवाद राधा जी  प्रतिक्रियेबद्दल!

सतिश

अनिलभाऊ.. क्या बात है.. Quality आहे तुमच्या कवितेत..!

Anil S.Raut

आपल्यासारख्या जागरुक काव्यप्रेमींच्या
प्रतिक्रीयाच मला कवितेत प्राण ओतायला
प्रेरणा देतात म्हणुन मी आपल्या सर्वांचा
मनःपुर्वक आभारी आहे ...सतिशजी !