स्वर अनामीक

Started by सूर्य, October 25, 2014, 08:15:51 PM

Previous topic - Next topic

सूर्य

एक काटा मला आवडू लागला ..!
जीव माझा तुझ्यावर जडू लागला ..!

अर्थ कळनार नाही इशारा हवा ,
शब्द ओठा मध्ये जर दडू लागला .. !

स्पर्श होता तुझा दर्वळे ही जखम ,
रोज अपघात माझा घडू लागला ...!

छेडली ही कुणी तार हृदयातली ,
स्वर अनामीक का सापडू लागला ...!

स्वैर करणार जो सर्व दाही दिशा ,
चालणारा खरे तर उडू लागला ...!

दूर गेलीस तू मानले मी खरे ,
एक अश्रु तुझाही रडू लागला  ...!

तू मला चाखले गोड झालीस तू ,
ओठ माझा मला मग कडू लागला ...!

काय दुनिया अमानुष अशी वागते ,
एक तारा नभी  बडबडू लागला ...!


संदीप पाटील (सूर्य)9892911617