पुढारी...

Started by Surya27, October 25, 2014, 11:09:51 PM

Previous topic - Next topic

Surya27


मोठे झाले हे पुढारी
घेवून जनतेची उधारी
गाड्या आल्या यांच्या दारी
झाली जनता भिकारी....

पाच वर्षातून एकदा
हे ठोठावतात दार
मागावया मत करिती
मग हसुनी नमस्कार....

भोळी-भाबडी हि जनता
पडते भूलथापांना बळी
मोर्चा-आंदोलने उभारून
जातो निष्पाप जनतेचा बळी.....

डोक्यावर घेवून भार
जनता वाहते भारा-मोळी
लाकडे जनतेची आणि
पुढारी शेकतो पोळी......

करुनी रक्ताच पाणी
जनतेची राही फाटकीच झोळी
भ्रष्टाचाराची घालून सांगड
खेळी पुढारी पैशाची होळी....

कष्ट करूनही राही
जनतेची झोपडी चंद्रमोळी
राहतो थाटात पुढारी
स्वर्ग सुखात महाली.....

चक्र हे असेच
राहणार का चालू?
हवालदिल राहे जनता
मेवा खाणार पुधारीरूपी भालू?.......

................................... सूर्या

शान्ताराम

जनतेची व्यथा चांगल्या प्रकारे मांडली आहे परंतु कविता कलात्मकतेत कमी  पडली आहे.जुळवाजुळवी झाली आहे.