विरोधाभास ....

Started by Surya27, October 25, 2014, 11:21:49 PM

Previous topic - Next topic

Surya27


स्वार्थी या दुनियेत .....
निस्वार्थी मोजकीच भेटतात.
डोळ्यातील अश्रू पुसायलाही..
पैसेच लागतात....

मरणही आजकाल.....
विकत घ्याव लागत.
मेल्यावरही आत्म्याच्या शांतीसाठी.....
श्राद्ध घालावच लागत.

जिवंतपणी कावळा शिवला .....
तर विटाळ होतो म्हणे.
मरणानंतर कावळा शिवला .....
तरच मोक्ष मिळतो म्हणे.

कितीही विचार केला....
तरी नाही पटत मनाला.
किती हा विरोधाभास ....
जीवन जगण्यातला.
.....................................सूर्या