अस्मिता

Started by Mangesh Kocharekar, October 27, 2014, 09:32:25 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


                   अस्मिता
मी मराठी अस्मितेचा मानकरी पण माझ्या हाती नाही झेंडा
  मी नाही कोणत्याच पक्षाचा अन माझा नाही छुपा अजेंडा
  मी मराठी मनाचा पाईक,पण नाही बांधला कुणाचा गंडा
  जगण्यासठी खोट बोलण पाप नाही हाच माझा स्वतःचा फंडा

  मी वाचतो काहिही पण  रुचेल तेच तळाशी जपतो
  सारे गाडीत गप्पात रंगतात मी उभ्या उभ्याच झोपतो
  राजकारण अन व्यावहारिक गप्पा ऐकुनच मी  विटतो
  गच्च भरलेल्या गाडीत मी मलाच एकांती निवांत भेटतो

  निवडणुका जाहीर होतात ढोल, ताशे, हलग्या वाजतात
  नेत्याच्या आवेशी  भाषणाला टाळ्या शेकडोंनी पडतात
  पण कुणी विरोधात बोलला तर रात्रीतच त्याला गाडतात
  लोकशाहीच्या नावान खुलेआम नोटा वाटुन मत मागतात

  मी सारे पाहूनही पाहात नाही,मला जगण्याची असते घाई
  माझा मान,अभिमान,अन अपमान हि असते उडणारी शाई
  दुसऱ्यासाठी "सोसण"चा अर्थ आपल्या शब्दकोशातच नाही
  धर्म दुसऱ्याला संपवा अस न  सांगताही मी होतो कसाई 

  माझ्या अस्मितेचा रंग,अन जातकुळी मलाच कळत नाही
  सत्तेसाठी सारेच लढतात,मी जगण्यासाठी लढतो ठाई ठाई
  कधी गरिबी,कधी निसर्ग,कधी शेजारी तर कधी जन्मदात्री आई
  खरच अस्मीता मोठी ,कि पोटाची भूक हे मलाच कळत नाही

  खर वाटणार नाही,पण शेकडोंची नित्य भुकेशीच असते लढाई
  निवडणुक ,सरकार ह्या शब्दांपेक्षा गांधी नोटेची असते नवलाई
  निवडून कोण आल,कोण उताण पडल ह्याला अर्थच उरत नाही
  उपेक्षितांच्या जगण्याला अस्मितेचा वारा स्पर्शच करत नाही                               
     मंगेश कोचरेकर