सरडा ( भावानुवाद)

Started by विक्रांत, October 29, 2014, 09:06:02 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



सरडा (मणि मोहन मेहता यांच्या कवितेचा भावानुवाद)

हिरव्या झाडीत बैसला सरडा
हिरव्या रंगाचा होवून सरडा
जबड्याहूनी ती जबर घातकी
रंगांची त्याच्या जहरी चकाकी
हिरवा मारक लपता झाडीत
येता खालती भुरकट मातीत
खिसे भरुनी ढेकर देवूनी
येई घराला सरडा परतुनी
सायंकाळचे ते पाच वाजता
रंग तयाचा असेल कोणता
प्रियेशी प्रेमाचा रंग कुठला
अन कुठला चुंबिता बाळाला
कुठल्या रंगाचा लावून चेहरा
सरडा परतेन आपुल्या घराला
काय असेल ठावूक तयाला
का रंगात सरडा हरवलेला

अनुवादक
विक्रांत प्रभाकर