डॉ .काळे सर

Started by विक्रांत, October 31, 2014, 08:21:29 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


काळे सरांवर कविता लिहिणे
खरच अवघड होते
त्यांना जाणणे म्हणजे
शिवधनुष्य उचलणे होते.
काळे सर होते
सदैव उंचावर बसलेल्या 
कर्मनिष्ठ साधका सारखे
तटस्थ शांत व्यग्र कार्यमग्न
त्या त्यांच्या साधनेतील
यम नियम तर
अगदी स्पष्ट ठाम होते
सत्य कष्ट परखडता
प्रामाणिकता कर्तव्यनिष्ठा
हे पंचाधार होते

या माणसाचे मोठे पण
फार कमी लोकांना कळले
कारण खोटेखोटे जुळवणे
बळेच कुणाला सांभाळणे
चालढकल करणे
त्यांना कधीच जमले नाही
आणि कुणाचीही
सुखनैव चाललेली वेळेची चोरी
कामातील चुकारी
त्यांना सहन झाली नाही

सात्विक संतापाने
अन चिडून उद्वेगाने
कधी समोरच्याला दुखवून
बोललेही असतील ते
पण कुणाचाही अनादर 
कधीही केला नाही त्यांनी
रागावतांना खडसावतांना
पित्याची भूमिका
कधीही सोडली नाही त्यांनी

काम झाले पाहिजे
नव्हे चांगले झाले पाहिजे
संपूर्ण झाले पाहिजे
यावर त्यांचा कटाक्ष होता
किंवा अट्टाहास होता
असे म्हणा हवे तर

कष्टाळू अन कामसू माणसाकडे
देव कामाचा लोंढाच पाठवतो
याचा अनुभव सर
कॅजुल्टीत असल्या पासून
आहे आम्हा सर्वांना
पण विनातक्रार जे समोर येईल ते
जिथे सोपवले गेले तिथे
ते काम त्यांनी स्वीकारले
अन तडीस नेले मनापासून

महानगरपालिकेत केवळ पगारावर
इतके झोकून देवून
काम करणारी माणसे
फार विरळ असतात
आणि अश्या विरळ माणसात
आमचे काळे सर होते
हे निर्विवाद !
अश्या कर्मयोगी माणसाचा
निरोप घेणे ही
संस्थेची मोठी हानी असते
पण अशी माणसे आपल्या
कामाचा ठसा उमटवून जातात
असे काम करायला खूप लोकांना   
प्रोत्साहित करून जातात
ती त्यांची प्रेरणा
आमच्यात थोडी तरी
तग धरून राहो ही प्रार्थना !

डॉ.विक्रांत तिकोणे