* दगड *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 01, 2014, 08:58:52 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* दगड *
हुरहुर लागली मनाला
दोष देउ कुणाला
मीच पुजले दगडाला
आता सांगु कुणाला

करुन हत्या फुलांची
वाहिली मीच दगडाला
पावल तरी कसा
मग माझ्या नवसाला

मारल्या फे-या रोजरोज
या देवापायी मंदिराला
दगडात शोधत राहिला
दिसला नाही माणसातला

घास नाही भरविला
कधी मंदिराच्या भिका-याला
दुधतुपलोणी नेहमी नैवेद्याला
पुजारीच खुष झाला

का गाउ गाह्राणं
मी स्वतःच दुस-याला
चुकलो होतो स्वताच
दोष का देउ दगडाला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.
Date- 01/11/2014
Time - 08:44