बाबा तुमचे दलित

Started by sanjay limbaji bansode, November 01, 2014, 09:05:10 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

बाबा तुमचे दलित
पिऊन पड़ती गल्लीत !
रात्र दिवस असती
दारूच्याच आळीत ! !

नाही त्यांना बुद्धाची जानं
मास मच्छि त्यांच खानं
विझवीले त्याने केंव्हाच
तुम्ही पेटीवलेले रानं
रात दिस असती मग्न
आपल्याचेच पाय ओढित !
बाबा तुमचे दलित
पिऊन पड़ती गल्लीत ! !

तुमच्या गाड्याचे चाक
कधीच त्याने तोडल
नाही त्यांना कुणाचा धाक
ढोर खान नाही सोडल
रात्र दिवस दिसती
हाडे त्यांच्या चुलीत !
बाबा तुमचे दलित
पिऊन पड़ती गल्लीत ! !

डोक त्यांच खोक
खाऊन सुस्त दिसती बोक
नाही कुणी त्यांच्या माघ
झोपले सारे तुमचे वाघ
भानामती अन चटकीची किमया
आजही बसतात बोलित !
बाबा तुमचे दलित
पिऊन पड़ती गल्लीत ! !

संजय बनसोडे 9819444028

monam1821

Dear Mr. Bansode,

Your poems can I post on my whats group./ can i share it on my facebook.

Please. Let me know.

Thank you,

Bindu Mohite


sanjay limbaji bansode