दान नशिबाचं.........

Started by प्रशांत दादाराव शिंदे, November 03, 2014, 10:26:14 AM

Previous topic - Next topic
हातातुन सांडलं सारं
सुखानं भरलेलं दान नशिबाचं

डोळ्यांनी चक्क बदलत गेलं

नात्यांनीही दारातच रोखलं आभाळात तेव्हा काळोख दाटला
अन पावसालाही माझे हसु आलं


ना अंगाणात जागा ना
त्या भिंतीआड आपले कुणी
माझं आयुष्यं जसे त्या फुटक्या काचा....


वेचुन घेतल्या जरी त्या कुरुपच आता
जवळ कुणी घेणार नाही म्हणे
काढतील रगात ह्या


डोळ्यांत आला प्राण
अन तो ही उगीच भांडतो आहे

जगुही द्यायचे नाही तुला
मरणही द्यायचे नाही

त्या देवाचा निरोप आलाय
पैसे हातात नसतील जवळ
तोवर तुझ्या
वरचं एक लाकुडही जळायचं नाही......
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२६/०८/२०१४ ...