भेट.

Started by pralhad.dudhal, November 03, 2014, 11:40:26 AM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal

भेट.
वर्षामागुन गेली वर्षे स्मृतीतून पुसटले नाव!
झाली होती भेट कुठे ती विसरून गेले गाव!
आज कित्येक दिवसांनी पुन्हा भेटलीस आणि
ताजे होऊन पुन्हा हुळहुळले लागलेले जुने घाव!
आठविल्या अवचित संगे चाललेल्या त्या वाटा
अवसेची ती रात्र किर्र आणि भवताली सन्नाटा
आज कित्येक दिवसांनी पुन्हा भेटलीस आणि
घाम दरदरून  आला अंगावर सरसरून काटा!
आठविता आठवेना त्यानंतरचे आपले जीवन
कसे विलगले जर एक होते आपुले तनमन
आज कित्येक दिवसांनी पुन्हा भेटलीस आणि
वेचीत  राहिलो हरवले स्मृतींचे ते कण कण!
असतील कदचित नियतीने चितारल्या  रेषा
भरकटले तारू अन वेगवेगळ्या झाल्या दिशा
आज कित्येक दिवसांनी पुन्हा भेटलीस आणि
चाळविली अचानक पाहिल्या रम्य स्वप्नांची भाषा!
नकोच शल्य  निसटल्या मयूरपंखी त्या दिनांचे
कृतज्ञ आहे संगतीतल्या मस्त धुंद क्षणांचे
आज कित्येक दिवसांनी पुन्हा भेटलीस आणि
निवळले संशय उतरले ओझे ते मणामणाचे!
                                                                  ..............
प्रल्हाद दुधाळ.