ललाटी रेषा ।

Started by SONALI PATIL, November 03, 2014, 08:49:48 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

बंद खिडक्या दारा मागे,
कसला काहुर ग आला ।
कुणा श्रिमंतीचा विरह झाला,
कुणी गरिबीचा झेला लेला ।
दुखःमय अंधारी कोठडी पाहूणी,
सुवर्ण किरणे न कधी थबकती।
तो चालतो पुढे पुढे,
अन लाचार हात पसरूनी मागे मागे ।
आश्रुंचा टाहो मांडुनी तेथे,
कसला काळाचा घाव बसला ।
झडून जाती नाती-पाती,
उरात तगमग ऊफाळुनी येती ।
बंद खिडक्या दारा मागे,
मंद झाल्या प्रकाश वाती ।
शापीत भिंती,
क्रोधीत नियती,
विजवतील जीवन कांती।
मग लढत लढत टेकतील,
हात नियती भोवती ।
झडूनी जावे वलय दरीद्री,
पुसोनी ललाटी रेषा ।
मी ही जगेन मग,
हसत हसत,राजहंस पक्षा...

सोनाली पाटील.

सतिश

क्या बात है..! Really Nice..!!