तुझी सौभाग्यवती ...........

Started by प्रशांत दादाराव शिंदे, November 04, 2014, 09:40:37 PM

Previous topic - Next topic
ओठांना टोचलं तर राग मानु नको सख्या रे
मी अशीच साधीभोळी
कुठं देऊ मी वेळ सजावया
मला कुठं कळतं फँशन अन नटनंथटनं
मला आपली साडी चोळी बरी रे....
पण प्रेम माझे जाणुन घे
हातातल्या जखमा ह्या
तुझ्या स्पर्शाचे औषध दे

दासी समज तुझी कि तुझीच मी बाहुली
माझ्या दु:खात मागे रहा उभा तु होऊन माझी माऊली
तुच माझं प्रेम तुच आहेे अस्तित्व
तुझ्याच मिठीत होऊ दे बंद डोळे
जाऊ दे मला अंगणातुनी होऊन तुझी सौभ्यग्यवती....
-
©प्रशांत डी शिंदे....
04-11-2014



सतिश

सुंदर प्रयत्न केलाय.. कविता बऱ्यापैकी पकड घेतेय..

क्षमा असावी.. पण शेवटच्या तीन ओळी थोड्या अस्ताव्यस्त वाटतात..