..जिंदगीचा लोच्या....

Started by विक्रांत, November 05, 2014, 12:43:57 AM

Previous topic - Next topic

विक्रांत


तसा तर जिंदगीचा
लोच्या साऱ्या झाला आहे
इस्त्रीचे कपडे वरी
रंग विटलेला आहे

सक्तीचीच पोटभरू 
चिटकवली नोकरी
बळे सांभाळतो नाती
बांधलेली व्यवहारी

उपाशी मरण्याहून
हे सुद्धा वाईट नाही
पोट भरणे म्हणजे
पण जिंदगानी नाही

फेकायला हवे तेच
अविभाज्य झाले आहे
जीवनाने म्हणा जणू
कि गुलाम केले आहे

किती मारू रोज रोज
तेच तेच सात फेरे
बांधलेली गाठ आहे
मानुनिया उगा खरे

सुटकेचा मार्ग बंद
गाव गल्लीचा तुरुंग
छाती काढून चालणे
करणे मुक्तीचे सोंग

आणि काही करू जाणे
असते बंड फसणे
गळ्यामध्ये फास अन
फळीस दूर लोटणे



विक्रांत प्रभाकर