उंचावरून

Started by विक्रांत, November 06, 2014, 08:08:46 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

उंचावरून जग हे
किती वेगळे दिसते
वेड्या वेंधळया मुंग्यांचे
जणू वारूळ वाटते

सैरावैरा धावणारे
अन्नासाठी मरणारे
दैवाधीन पराश्रित   
जीवन सारे वाटते

पुन्हा खाली येणे नको
पुन्हा मुंगी होणे नको
मन कुणास म्हणते
मज ते असणे नको

निळे विशाल आकाश
मनामध्ये उतरते
पुसलेल्या फळ्यागत
अस्तित्व होवून जाते

विक्रांत प्रभाकर