मी प्रवाहा सारखा

Started by केदार मेहेंदळे, November 07, 2014, 09:37:06 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मी प्रवाहा सारखा 
लगावली (गालगागा/ गालगागा/ गालगागा/ गालगा)
वृत्त : देविप्रीय मात्रा : २६

तू किनार्या सारखी अन  ...... मी प्रवाहा सारखा
वाहणे विधिलिखित माझे......मी घराला पारखा

जन्मतः नशिबा सवे मी......मांडला दावा उभा
फैसला कर याच जन्मी......  फार झाल्या तारखा

टाळले त्याला जरी   ...... प्रारब्ध मज ना सोडते
मी जिथे... येते तिथे ते..... .होवुनी माझा सखा

दलित त्याचे कार्ड तर......  याला भटांचा वारसा
एक झाका... एक काढा...... सारख्याला वारखा

जन्म केवळ कैद येथे......  भोग तू शीक्षा पुरी
मरण ना हाती इथे ...... घे फास तू...वा वीष खा!

केदार...

(''तू किनार्या सारखी अन......  मी प्रवाहा सारखा''  ही ओळ कोणी लिहिलं असल्यास मला माहित नाही. कोणाला माहित असल्यास कृपया कळवावे. अर्थात या ओळी व्यतिरिक्त सगळे शेर मीच लिहिले आहेत. )