शहरात काय खर नाय ।

Started by SONALI PATIL, November 07, 2014, 10:48:50 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

नको जावू आई तू ,
दादाच्या मागे मागे ।
तो जाईल कामाला,
उरणार कोण त्याच्या मागे ।
शहरामध्ये माणंसानां,
लागत नाहीत माणसे ,
लागतात फक्त ईथे,
सर्वांनसाठी पैसे ...
शेजारी शेजार्याला,
महीना महीना दिसत नाय।
हाय कोण, मेल कोण,
कोणी केणाला पुसत नाय ।
नको जाऊ आई तिथे,
माणूस माणूसाला ओळख आपली दाखवत नाय ।
मराठीला लाजतात सारे,
इंग्रजीच खूळ हाय ।
माणसा पेक्षा तिथे,
कुञ्यावरती जास्त जीव हाय ।
परदेशाची ओढ हाय,
साडी-चोळी टाकून,
जीन्सची फॅशन हाय ।
प्रदुषणांनी झपाटलय,
महागाईंनी घेरलय,
कृञीम होत चाललय सार ।
लहान घरे,
लहान मने,
धाव धाव धावतात ईथे,
पैशासाठी माणस...
घरामध्ये तानुल्यासाठी दिवसभर,
आई बाबा सापडत नाय...
नको जाऊ आई तू,
शहरात काय खर नाय ।
माणूस तिथे माणसाला
ओळख आपली देत नाय....

सोनाली पाटील.


Naval Dongerdive

खरच तु किती छान लिहीलेस,


इवलश्या कवितेत
मनुष्याचे दैनदिन जिवन तु व्यक्त केलेस
खरच तु किती छान लिहीलेस,,,,,

इवलश्या कवितेत
मनुष्य कोणत्या वाटेवर चालतोय
याची ओळख तु त्याला करुन दिली ,
खरच तु किती छान लिहीलेस,
खरच तु किती छान लिहीलेस.....!!☺!!


                         नवल डोंगरदिवे,
                        8411011065.