एक सुंदर वासरु

Started by sanjay limbaji bansode, November 09, 2014, 01:11:28 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

एक सुंदर वासरु वाट चुकलं
चाराच्या शोधात आईला मुकल

चाराच्या शोधात गेल ते दूरदूर
आई साठी मन त्याचे होत होते हुरहूर

चाराविना मन त्याचे गोठ्याकडे वळेना
कुठ गेल वासरु आईला काही कळेना

चालता चालता दिसला एक नदीचा किनारा
दिसला तिथे त्याला हिरवागार चारा

हिरवागार चारा रोज खात होता भरभरून
हळु हळु आईला जात होता विसरून

चाराच्या लालचीन घर त्यान तिथच केल
एक सुंदर वासरु आईला विसरून गेल
एक सुंदर वासरु आईला विसरून गेल

संजय बनसोडे 9819444028

Shraddha R. Chandangir

[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]