परिक्षेच्या चारोळ्या ..

Started by Çhèx Thakare, November 09, 2014, 09:48:23 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

*********************

परिक्षेच्या चारोळ्या ..

*********************

परीक्षा जवळ आली कि धडधडायला लागतं
कमी अभ्यासा पोटी जिव तडफडायला लागतं

*********************

पाठ करण्यासाठी मी एक ऊत्तर
चार चार वेळा वाचून काढतो ..
आणि तरीही पाठ झाल नाही
कि मग पानच फाडून काढतो .. 

*********************

पुस्तक ऊघडल
कि डोळे बंद होतात
मग शांत झोपे साठी
ते क्षणही मंद होतात 

*********************

अभ्यासाला बसल
कि मन लागत नाही
आणि
नेट चालू केल्या शिवाय
माझ भागत नाही

*********************

पेपर सोप्पा आला कि वेळ पुरत नाही ..
अन्
पेपर अवघड आला कि वेळ सरत नाही ..

*********************

©  चेतन ठाकरे

MK ADMIN


Çhèx Thakare

:) हा हा  ____/!\_____ धन्यवाद एडमिन .. साहेब ..