कविता अन मी

Started by विक्रांत, November 10, 2014, 09:51:18 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

अभंग न येत मजला
न जमतात गजला
भावनांचा पूर येता
शब्द होतात पाचोळा

उमटे आकार काही
उंच उडुनी धुरळा
घडणार कसे काही
माहित नसे कुणाला

लागतो कधी कश्याने
घोर या वेड्या जीवाला
तळमळता मन हे   
शब्द येती सांत्वनाला

रुजतात भाव आत
ये अंकुर प्रतिभेला
जाती मुळ्या खोलवर
उसवत अंतराला

विक्रांत प्रभाकर

सतिश

अतिशय सुंदर लिहिली आहे कविता.. मला मनापासून वाटत कि यात शेवट करणारा आणखी एक कडवा असावा..

विक्रांत

सतीश धन्यवाद ...जगातील कुठलीच कविता पूर्ण नसते ...आपण तर तृणपर्णे...जन्मणे वाढणे बहरणे हाती नसते