उपेक्षित ( माझ्या अपंग बंधु-भगीणींना समर्पित )

Started by गणेश म. तायडे, November 10, 2014, 10:47:19 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

उपेक्षित मी या जगाला,
वेगळी ओळख माझ्या जगण्याला...

पाहणारयाची नजर वेगळी,
वागवणारयाची वागणुक वेगळी...

मोहताज नाही मी दयेचा,
साथ हवा फक्त माणूसकीचा...

नको मला वागणुक वेगळी,
एकाच देवाची लेकरे सगळी...

जन्म घेऊनी अपराधी ठरलो,
आयुष्यभर डोक्याचे ओझे बनलो...

नको मला असे जिवन जगणे,
नको मला असे हतबल वागणे...

मित्रांसोबत आहे खेळायचे मला,
पाखरांसंगे उडायचे मला...

उंच शिखर मज गाठायचे,
सप्त समुद्र पालथे पाडायचे...

देवाचा मी लेकरू विशेष,
नका करू मज नामशेष ...

जरी अपंग मी शरीराने,
खंबिर उभा मी आहे मनाने...

उपेक्षित मी का या जगाला,
ओळख वेगळी का माझ्या जगण्याला...?

- गणेश म. तायडे
खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com