भेट त्यांची अधुरी ....

Started by shrikant.pohare, November 11, 2014, 01:20:44 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

निखळ शांततेत
         रात्रीच्या काळोखात
कीर कीर रातकिड्यांची
          गुंजते कानात .

दूर हा आम्रतरू
      उभा काळ्या शेतात
टिकल्या काजव्यांनी सजविल्या
       त्यांच्या हिरव्या पानांत.

झुळ झुळ वाहते मंजुळ पाणी
         भेटावयास आले चंद्र चांदणी
भेट त्यांची अधुरी राही
       जेव्हा वारा धाव घेई  .....श्रीकांत पोहरे


सतिश

वाह.. श्रीकांत.. अतिशय सुंदर लिहिलेय कविता..
फारच छान..

shrikant.pohare