आरे आवरा याला!

Started by केदार मेहेंदळे, November 12, 2014, 12:06:04 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मात्रा मोजत जन्म अख्खा सरला साला
शेर.... परंतु एकही ना जमला त्याला

वजनी बोली फारच त्यांनी वापरली हो
पण शेराचे वजन जसे पाचोळा पाला

काल रातीचे खाणे पिणे फारच नडले
तरी सकाळी जुलाब नाही.....शेरच झाला

हे गझलेचे कागद त्याचे...... रद्दी साली
करा सुरनळी आणि तयाच्या  **त घाला

वेड लावतो तीळ प्रियेच्या मानेवरचा
ह्रिदय छेदतो पार तिच्या नजरेचा भाला

केदार...

वरील रचनेतील पहिला शेर माझे फेबु मित्र Kishor Mugal ... यांचा आहे. त्यांच्या या शेरात असा काही तडका होता कि मोह आवरला नाही आणि मग काय झालं त्याच वर्णन माझ्या तिसर्या शेरात आलंच आहे. मजेचा भाग सोडून द्या. पण खरोखरच वरील कडवी मला spontaneously सुचली आहेत आणि त्यात काना मात्रा वेलांटी काहीही न बघता मी ती तशीच्या तशी पोस्टली आहेत. (किशोर भौंची परवानगी घेऊन. अर्थात मी आधी हे शेर (?) प्रतिक्रियेत पोस्टले आणि मग परवानगी मागितली. हे म्हणजे घरात शिरल्यावर परवानगी मागण्या सारखे होते. पण किशोरभौनी परवानगी दिली आणि आता ते मी इकडे मांडलं आहे.)  जे लिहिलंय ते आवडलं तर या ''गझल स्ट्रगल''चं श्रेय किशोर भाऊंचे आणि नाही आवडलं तर माझ्या ''घरावर गोटे''.