अरे माणसा!

Started by गणेश म. तायडे, November 12, 2014, 09:37:59 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

अरे माणसा! हवेत उडण्याचा
नाद तु सोडून दे,
उडणाऱ्याचे घर असते नेहमी
जमीनीवर लक्षात असु दे,
मला तर नेहमी वाटते की
तु उंच उंच शिखर गाठ,
पण हे ही विसरू नकोस की
मोठ्यांची ही असते गर्वाशी गाठ,
मला ही असे वाटते की
तु गर्व कर... पण
एक माणूस आहे म्हणुन कर,
एक नागरिक आहे म्हणून कर,
मग बघ तु गाठलेले शिखर
कसे सोन्यासारखे चकाकते,
तुझ्या फक्त स्पर्शानेही
गंगा गोदावरी पवित्र होते,
अरे वेड्या! लोभ माया अहंकार
लालसा तु कमवशिल,
पण मृत्युनंतर पडलेल्या पुण्यानेच
तु नरकात जायपासून वाचशिल,
अरे वेड्या माणसा! आता तरी तु समजलास का?
अन् डोळे बंद करुन काट्यावर चालने सोडशील का?
दुसऱ्याचे घर पाडून स्वतःचे घर उभारशिल का?
आता तरी वेड्या माणसा! तु समजलास का?

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com