सर सुखाची येइल .....

Started by durga, November 13, 2014, 02:40:02 PM

Previous topic - Next topic

durga

स्वप्न खुप पहिली समुद्रा सारखी
त्यात रमून सगळ विसरले होते दुःख

स्वप्नात रंगून मनही त्यात हरवल होत,
म्हणतात आयुष्यात
कधीतरी स्वप्न पहाव...
स्वप्न असाव
उगवत्या सुर्यासारख ,
दिवस भर राबनार
अनवाणी माझा जीव
होरपळून निघतो तश्या जगण्यात
पण कीव कोणी आणु नका

स्वप्न पाहिली मी दुसर्यांच्या
सुखाची
त्यांच्या समाधनाची
दुसऱ्या साठी जगता जगता
स्वताः साठी जगन राहुन गेल
त्यांच्या सुखाची होळी तर पेटली
पण माझ्या आयुष्याच्या स्वपनाची चिता पेटली

वाटते कधी तरी
एकांत माळरानी
ही कळी येईल उमलुन
जरी जीवन गेल कोलमडून,
कधीतरी माझ्या ही जीवनात
वळीवाचा पाउस नाही
तर श्रावण सरी कोसलतील

असच स्वप्न पहाव,
वर्तमानाला विसरुन भविष्यात रमाव
मागच्या चुका विसरुन नव बी पेराव
झोपेच्या राज्यामध्ये छानसं स्वप्न पहाव..... —
आणि डोळे उघड़ताच
ते खर व्हाव ...

                     दुर्गा वाड़ीकर