बाजार माझ्या शिक्षणाचा ..

Started by Çhèx Thakare, November 16, 2014, 01:22:19 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

बाजार माझ्या शिक्षणाचा ..
   
या शिक्षणाच्या बाजारात आज मी त्या वेष्ये प्रमाणे ऊभा आहे ..
त्या पदव्या, ते कौशल्य घेऊन स्वत:ला विकण्यासाठी ऊभा आहे ..
मला ठाऊक आहे कोणीतरी भाव लावणार माझा ..
विकत घेतील माझ्या शिक्षणाला, अवघ्या त्या दोन दमडीत ते हि स्वत:ची स्वप्ने पुर्ण करायला ..
मला ते हि माहित आहे कि मला जास्त दाम मिळणार नाही..
तेवढी कलेच्या, शिक्षणांच्या आभूषणांची मी चादर पांघरून नाही आलेलो, किंबहूणा ति चादर पांघरायची माझी लायकीही नसेल ..
पण लायकी वर मात करून मी लायक बनायच ठरवल होतं ..
पण साल परत नशिबानं पाय धरले..
हातात पुस्तक झेलायला गेलो तर सालं रिटायरमेंट च्या वयात आलेल्या बापाच्या बेरोजगाराची बातमीच हातात पडली ..
हातातल्या पेनाची जागा साल्या पान्यान घेतली..
वह्यांची जागा त्या प्रोडक्शन शिटन घेतली ..
दुसरयांना पाहायचो हातात नोकरया घेऊन ऊभ्या असलेल्यांचे चांगले दाम लागायचे
त्यांच्या आभुषणांची चमक ईतकी होती कि त्याचे चटके साले लांब- लांबवर  बसायचे ..
ठरवल होत साल एक दिवस त्या बाजारात ऊभच रहायच
त्या आभूषणांनी खुप नटायच..
पण साल नशिबान फाटकी चादरच समोर आंथरलेली ..
फेकून दिली तिथच ती ..
पळालो तिथून ..
समोर दिवा होता ऊज्वल भविष्य दाखवणारा
चमकही त्याची खुप होती
पळालो त्याच्या दिशेने मग ..
अडथळे खुप आले ..
पण मी थांबलो नाही ..
त्या जळणारया दिव्यात मी माझ भविष्य गिरवत गेलो ..
या नशिबाच्या खेळात मी स्वत:शीच लढत गेलो ..
आणि लढता लढता खुप वेळा पडलो ..
मधे मधे पडून परिस्थिती सोबत लढून फाटलेली आभुषणांची चादर शिऊन, पांघरून या बाजारात आलो .

विकण्यासाठी ..
ते हि स्वत:ला विकण्यासाठी ..

©  चेतन ठाकरे ..