सत्तेची पोळी ..

Started by Çhèx Thakare, November 16, 2014, 11:08:00 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

सत्तेची पोळी ..

ज्यांनी त्यांनी आपल्या सत्तेची पोळी भाजून घेतली ..
आपल पोट भरण्यासाठी मतांच्या चुलिवर पोळी भाजून घेतली ..
कोणी मराठी च्या नावान भिक मागत होत तर कोणी माझ्या शिवरायाच्या नावानं तर कोणी माझ्या प्रदेशाच्या पैसा ऊधळून या प्रदेशाच्या विस्तवा वरच पोळी भाजून घेतली ..
पण तो गड आंधारात होता ..
आणि यांचे सोहळे माञ लख लख करत होते ..
वाघ म्हणून गरजणारे माजंर बणून लपले होते ..
वंशज म्हणून मिरवणारे स्वत:लाच मिरवत बसले होते ..
शेवटी तो अंधारातच होता ..
ज्याने अवघ्या प्रदेशाला आपल्या वास्तवाने चकाकून टाकले होते ..
त्यांच्या कर्तबगारीच्या प्रखर ज्योतीने अवघ्या हिंदूस्थानावर प्रकाश टाकला होता ..
पण आज तो अंधारात होता ..
काळ्या अंधारात ..
आणि हे माञ आपल्या रंगात रंगत होते ..
या राज्याच्या पोटावर पाय देऊन त्यांचे प्रदेश आपल्या पोटात गिळणारे ते, तोंड वाकडे करून बसले होते ..
त्या पाणी पुरवणारया धरणांची तर मुतारीच करून ठेवली होती ..
दलित म्हणवणारे हे,  दलित म्हणून मरत होते शिक्षणाचा वाटा समोर होत्या पण मागासवर्गांच्या पट्ट्या डोळ्यावर बांघून त्या वाटेवर यांनी जाणेच सोडले ..
आणि त्या मागासवर्गाच्या जखमेवर यांचे नेतृत्व पोळी भाजत निघाले ..

या मराठी माणसाला
ते जिवंत भाजत निघाले ..

©  चेतन ठाकरे