एक दिवस असा होता............

Started by sandeep.k.phonde, November 12, 2009, 02:07:34 PM

Previous topic - Next topic

sandeep.k.phonde

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं...!


Author Unknown

Shyam

कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं...!........ masta................

santoshi.world

माझी आवडती कविता  :) ...................... मला ह्याचे कवी / कवियत्री कळू शकतील का?

MK ADMIN

@Sandeep

Please read our forum rule


You can post any kavita of yours with your name below. Also, you can post any kavita from any author you have liked so far,in this case you are requested to post name of original author. In case you dont know name of author kindly post "Author Unknown".

1. कविता चोरीच्या नसाव्यात.
2. कवितेखाली कवीचे नाव असावे .
3. जर कविता आपली नसेल तर खाली मूळ कवीचा उल्लेख करावा.. किंवा मूळ कवी माहित नसेल तर .. (Author Unknown) असे लिहावे.



Please follow the rules and keep posting such beautiful poems. Enjoy on MK  :)