नको रे बाबा

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, November 18, 2014, 02:25:03 PM

Previous topic - Next topic
नको रे बाबा
(जानेवारी २००९ च्या 'किशोर' मासिकात प्रकाशित)

दूध प्यायला बोकोबा
खिडकीत बसले टपून
घरात हाती काठी घेऊन
बंडू होता लपून

आत शिरताच बोकोबांवर
फटका बसला काठीचा
कळ गेली झिणझिणत नी
कणा मोडला पाठीचा

कसेबसे खिडकीतून मग
पसार झाले बोकोबा
मनात बोलले "यापुढे
दूध पिणे नको बा"




Ravi Padekar