काळ

Started by gajabhauchougule, November 23, 2014, 04:45:31 PM

Previous topic - Next topic

gajabhauchougule

काळ
////
आता नाही कण्हायाचे
सारे सारे सोसायाचे
कण्हत कण्हत सोसताना
जखमा धरुन पळायाचे
   कोण मागे कोण पुढे
   आता नाही पहायाचे
   मणामणाचं ओझं घेऊन
   असेच पुढे चालायाचे
एक मी अन् एक तू
मेळ कसा जमायाचा
आसवांचा कढ सारा
पापण्यांतच जिरवायचा
   हा माझा तो माझा
   आपण नुसते म्हणायचे
   आठवणींची चादर घेऊन
    मुक्कामाला पोहचायचे
जुने जाते नवे येते
दिवस रात्र हे चालायचे
काळाच्या पडद्याआड
आपलेच नांव पुसायचे

   गजाभाऊ चौगुले
   ९९७०२०९६३३