हुंदका

Started by gajabhauchougule, November 24, 2014, 01:34:36 PM

Previous topic - Next topic

gajabhauchougule

 :'(
या उदास सायंकाळी
झाडातुन झरली गाणी
काळोख दाटण्या आधी
डोळ्यांत उतरले पाणी
  डोहात सांडले नाही
  आभाळ तुझ्या रंगाचे
  भेटेल कधी मज आता
   ते विश्व नव्या पंखाचे
आयुष्य सोसतो आहे
मी तुला वाचतो आहे
जगण्याच्या कबरी मध्ये
मी मला शोधतो आहे
  दारात रुतुंच्या मीही
  मधुमास मागतो थोडा
  उधळीत धुळीचे लोट
  मज वळीव भेटला वेडा
स्वप्नांच्या पाणवठ्यावर
अंधार घटातुन भरला
ये प्रिये आता भेटाया
हुंदकाच केवळ उरला
   
     गजाभाऊ चौगुले
      ९९७०२०९६३३

Çhèx Thakare

खुप छान मिञा  ... मस्तच ..

aspradhan


सतिश

क्या बात है... सहीच..!!

amolmangalkar007