तृषार्त...

Started by शिवाजी सांगळे, November 25, 2014, 07:55:27 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तृषार्त...

सुर बासरीचा
नादावतो राधेला,
भास दरवळ तूझा
करी व्याकुळ मनाला !

रीमझिम सरीची
वेदना ढगाला,
तृषार्त मन माझे
आतुरले तुज भेटीला !

आसवांचा विरह
जसा पापणीला,
दुखः माझे कधी
कळलेच ना तुजला !

©शिवाजी सांगळ॓
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९