स्री

Started by Shivangi, November 26, 2014, 02:44:41 PM

Previous topic - Next topic

Shivangi

कधी ती एकटी , कधी ती उदास
न जाणो कसला असे तिला ध्यास ...

कधी आतुर ती , कधी बेभान
कधी पावसाच्या सरीमध्ये भिजे तिचे मन ....

कधी सूर ती , कधी मौन
कधी मनकवडी ,  जाणे जीवाचा कौल ...

कधी गंभीर समुद्र ती , कधी अवखळ झरा
कधी ओसरती नदी , कधी सुसाट वारा ....

कधी प्रेयसी ती, कधी पत्नी
कधी माता , तर कधी सती ...

कधी बावरी ती , कधी चलाख
कधी लख्ख प्रकाश तर कधी काळोख

कधी खळखळ गीत , कधी राग मल्हार
कधी सौम्य ती कधी रुद्र , कधी जीत कधी हार ....

अबला नसे ती , पटवून घ्या खात्री
ती तर संपूर्ण जगाची  अधिष्ठात्री 

------- कल्याणी