आज़ोबा तुमची खूप आठवण येतेय...

Started by Aishu, November 29, 2014, 11:54:48 PM

Previous topic - Next topic

Aishu

आज़ोबा तुमची खूप आठवण येतेय
आठवणीत त्या अश्रु मी गाळतच राहतेय

आजीला तर तुमची खूपच आठवण येतेय
न काही खाता पिता आठवणीत तुमच्या ती रडतच राहतेय
तासनतास ती तुमच्याच फोटोकडे पाहत रडतच बसतेय
माझा राजा कुठे गेलास मला सोडून ,मलाही न्यायचे होते संगे असच ती म्हणत राहतेय
कपड्याच्या तुमच्या कपाटाकडे धाव घेऊन कपाटालाच ती घट्ट मिठी मारून तशीच कीती तरी वेळ आठवणीत ती उभीच राहतेय
सावरण तीला मला काही झेपतच नाहीय
तीला या अवस्थेत पाहून मीच कोसळत राहतेय

मी मात्र रागावलेय आजोबा तुमच्यावर
नाही तुमचा हात आता आमच्या डोक्यावर
होती इच्छार माझी ही तुमच्याकडे
न करता पुर्ण ती गेलात निघून देवाकडे
लावून सर्व नातीची लग्न तुम्ही गेलात
मग माझा विचार का नव्हता केलात

आजोबा कुठेत घरातील बारकी पिले विचारतात
सांगाव लागत आजोबा आता देवघरी असतात
कळत नाही त्यांना काय असत देवाघरी जाण
रडत राहतात आजोबा आजोबा म्हणत ती पिले सर्वजन

विश्वासच बसत नाही आजोबा तुम्ही नसल्याच
भासवत सतत तुम्ही सोबतच असल्याच...
तरीही आजोबा तुमची खुप आठवण येतेय
      खुप आठवण येतेय

. . Aishwarya Sonavane . .Mumbai..