एक चंद्र असतो , एकच असते चांदणी

Started by प्रशांत दादाराव शिंदे, December 02, 2014, 03:13:20 PM

Previous topic - Next topic



एक चंद्र असतो
एकच असते चांदणी
स्वप्न लक्षात कुठे राहतं
फक्त एकच चेहरा असतो ह्या नयनी

ती असते सामोरी
मी मात्र तिच्या ओठांवरी हास्य बनुनी
ती हसते मी पाहतो
माझ्या गप्प राहण्यानेच ती करते मला जवळी ....

एक चंद्र असतो
एकच असते चांदणी
सोबतच राहायचे आयुष्यभर
वचन घेतात दोघं सात जन्मीची

ती असते त्याची
तो असतो तिचाच
तरी मुद्दाम डिवचतो कधीतरी
म्हणतो ही आहे माझी प्रेयसी 


त्याला वाटते गंमत
ती होते आगीचा बंब
हा हसतो अन तिची आग मात्र प्रचंड

रात्र होते तरी दोघांत असतं अंतर
प्रिये तुझाच आहे मी अन तुझाच असणार
तुझी केली होती थट्टा
तुझ्या अश्या रागाचा मी गं आहे दिवाना


तिचा राग हरवतो
तिच्या गुलाबी चुंबनात     
असेच असावं आयुष्य आपले
दुखांतही   प्रीतीचा आसरा

असे हे प्रेमी अन सोबती आयुष्याचे
एक असतो चंद्र अन एकच असते चांदणी ...........
-
©प्रशांत डी शिंदे....
०२/१२/२०१४ ....