उखाणे

Started by marathi, January 24, 2009, 10:24:51 PM

Previous topic - Next topic

marathi

श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी

श्रावण जलधारांनी शांत होते धरती,
..... च्या पुढे कर माझ्हे जुऴती

सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
..... चे नाव घेऊन घेते मी रजा.


लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा.

रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
..... चे नाव घेते असु द्या लक्षात.


हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती,
..... च्या जीवनात सदैव मिळो शांती.


श्रावणात बरसतात धुंद जलधारा,
.....च्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलोरा.

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

marathi

अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
..... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.

भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.

श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार,
.... सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार.

वसंत ऋतुत कोकीळा गाती गोड,
.....गेले गावाला तर त्यांच्या येण्याची लागते ओढ.

3