माझी मैत्रीण....

Started by shirke vinay, December 11, 2014, 02:07:36 AM

Previous topic - Next topic

shirke vinay

माझी मैत्रीण.....

मला माझ्या बाळपणी ,
साथ तिची मिळाली होती.....
दोघेही लहान तेंव्हा,
जोडी मस्त जमली होती....

माझ्याच संगे खेळली ती,
माझ्याच संगे हसली होती....
माझ्याच संगे रुसली ती,
माझ्याच संगे रडली होती....

माझ्याच संगे झोपाल्यावर,
साथ माझ्या बसली होती....
साथ देऊन माझ्या सुरान्ना,
गान तीही म्हटली होती....

तिच्याचसाठी मीही तेंव्हा,
काही गाणी म्हटली होती....
काही तिची नावडती तर,
काही तिला पटली होती.....

पण........
आता सार वेगळ होत,
आता ती विसरली होती.....
कारण आता मैत्रीण माझी,
ख़ुप मोठी झाली होती.....

            विनय शिर्के 9967744137