क्षण साठलेले....

Started by शिवाजी सांगळे, December 16, 2014, 10:39:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

क्षण साठलेले...

सांगशील मला
कसे सावरू ?
हास्य लाघवी
कसे विस्मरू?

मार्दव स्वर
मज काळजाचा,
घेतोय ठाव
बघ कधीचा !

मोरपंखी गंधाचे
स्पर्शातून पाझरणे,
जमेल सखी
मजला विसरणे ?

भेटीचे आपल्या
क्षण साठलेले,
पुन्हा आठविता
मन गोठलेले !

©शिवाजी सांगळ॓
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९