जाणिव

Started by santoshi.world, November 16, 2009, 12:31:34 AM

Previous topic - Next topic

santoshi.world

जाणिव

जाणिव झाली आहे मला हि आता
नाही त्या वाटांवर पुन्हां जायचं,
या मनाला आता तुझ्यामुळे
नाही पुन्हां पुन्हां दुखवायचं.

मनाने घेतलेल्या निर्णयावर
आता सतत ठाम रहायचं,
काटेरी वळणांपासून त्या
स्वत:ला नेहमी दूरच ठेवायचं.

तु दिलेल्या त्या जखमांतूनही
आता नविन काहीतरी शिकायचं,
तुझ्या त्या सर्व आठवणी विसरून
एक नविन आयुष्य उभं करायचं

- संतोषी साळस्कर.

nirmala.



|| प्रशांत ||

मस्त कविता आहे आणि खरोखर प्रेरणादायी आहे.  

Parmita

kharach khoop sundar ahe kavita manapsun awadali...fakta amlat anata yayala hawe...

Mayoor


Dadaso133

Khup chaan...zakkaaaaaaaaasssss........aaplyala khup aavadli kavita.....lay bhaari...aflatoon

प्रशांत

तु दिलेल्या त्या जखमांतूनही
आता नविन काहीतरी शिकायचं,
तुझ्या त्या सर्व आठवणी विसरून
एक नविन आयुष्य उभं करायचं


खरचं खूप छान आहेत. या ओळी अगदी मनाला स्पर्श ( वेदना ) करून, पण एक संदेश ही देऊन जातात.
धन्यवाद !

futsal25

'जाणिव झाली आहे मला हि आता'

की तुमची कविता मला आवडली, छान आहे.  :)  :(   :)

aspradhan

मनाने घेतलेल्या निर्णयावर
आता सतत ठाम रहायचं,
काटेरी वळणांपासून त्या
स्वत:ला नेहमी दूरच ठेवायचं
  sundar Prayatna!!