थडगे

Started by sanjay limbaji bansode, December 20, 2014, 03:46:27 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

माळावरच्या  वाटेला
थडगे बांधिले कुणी
येणारा जाणारा त्याला
हाथ  जोडीतो दोन्ही !

आहे कुणाचे,कुणी बांधिले
नाही कुणा ठाऊक
येणारा जाणारा मात्र
होतो त्याचा भावुक !

कुणी त्यावर   लिंबू तोडी
कुणी त्यावर नारळ फोडी
कुणी  सांगे  मनातले
लाउन त्याला लाडी गोडी !

येउन बसला तिथं
आता एक साधु बुवा
झूलत असे लाऊन तिथं
धूप  अन्  दिवा
मांगत  असे  भक्ता
नेवेद्य अन्  सुका  मेवा !

थडग्याचा अन् त्याचा
जमला  होता  मेळ
रोजच चाले आता
थडग्या भोवती खेळ !
रोजच मिळे त्याला
सुका मेवा अन् केळ ! !

संजय बनसोडे