प्रत्येक जण

Started by शिवाजी सांगळे, December 22, 2014, 10:59:35 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रत्येक जण

प्रत्येक जण हल्ली
गंभीर, शांत आहे,
मोबाईल मुळे पुरता
स्वतःत मस्त आहे ।

चिंता, विवंचना सारया
नेटवर सोपवित आहे
केवळ बोलून कुणाशी
काय होणार आहे ?

संवाद खुंटला हल्ली
वादच उरला आहे
शब्दांशी तुटले नाते
वायफायशी जुळले आहे।

नात्यात खोटे बोलणे
फारच सोपे आहे
असते ट्रेन ठाण्याला
कामावर म्हणतो आहे।

काढुन वेळ थोडासा
मनाला विचारून पाहे
आपल्या सारखे लोक
तुम्हास टाळीत आहे।


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९