पिंजऱ्यात कसा गड्या तु

Started by sanjay limbaji bansode, December 23, 2014, 08:53:09 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

पिंजऱ्यात कसा गड्या ; तु पिंजऱ्यात कसा
स्वातंत्र्य कुणी केल तुझ वजा
पिंजऱ्यात कसा गड्या ;तु  पिंजऱ्यात कसा ! !


उत्तुंग सदा वंशज तुझा
पिंजऱ्यात कसली भोगती सजा
गगनचुंबी होती तुझी ये जा
पिंजऱ्यात कसा गड्या ;तु  पिंजऱ्यात कसा ! !


तोड तो पिंजरा हो आज़ाद
किती सहन करशी तु उच्छाद
नको राहूस या पिंजऱ्यात स्तब्ध
आहेस तु शौर्य , एक उस्ताद
घेतलाच का तु पिंजऱ्यात वसा
पिंजऱ्यात कसा गड्या; तु पिंजऱ्यात कसा ! !


मार भरारी फैलुनी पंख
जे टाकती दाणे मार त्याला डंक
आयत्या दान्याने नको होउस भंग
दाखव दुश्मना तुझा असली रंग
बस्स झाली आता तुझी सजा
पिंजऱ्यात कसा गड्या;तु  पिंजऱ्यात कसा


संजय बनसोडे