Yes! I am Drunk....

Started by केदार मेहेंदळे, December 23, 2014, 04:31:36 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

जिनही नाही, रमही नाही, बीअर नाही
ड्राय सारखा, दिवस कोणता, बोअर नाही

जरी भुलवते, रंग रूप हे, विलायतीचे
व्हिस्कीमध्ये, ''देशि''सारखा, फायर नाही

आयुष्याच्या, फार चिघळल्या, उरात जखमा
या जखमांवर, दारू जैसे, क्युअर नाही

प्रत्येकाच्या, सुख दुखा:चे, पदर वेगळे
बघायचे तर, गुत्त्या जैसे, थेटर नाही

गांव सुधरले, इथे थाटली, बीअर शॉपी
(गांवा साठी, डॉक्टर नाही.... टीचर नाही)

लाख लिटरचे, मद्य गाळतो, महाराष्ट्र.....पण
दुष्काळाने, इथे प्यायला, वॉटर नाही?   

मदिरे वानी, नशा तुझ्या गं, मिठीत नाही
माफ कर प्रिये.. आज जरा मी.. सोबर नाही

नशीब मजला, जे देते, भरभरून देते
दु:खहि देते, खंब्या इतके...... क्वार्टर नाही!

आज संपला त्यांचा, पुढच्या सोयी साठी
आजमधे मी जगतो, मजला फ्युचर नाही


केदार...