मी एक सुंदर झरा पाहिला होता

Started by Aishu, December 23, 2014, 11:36:47 PM

Previous topic - Next topic

Aishu

मी एक सुंदर झरा पाहिला होता
तसा त्याचा प्रवाह छोटाच होता
पाहिलय मी त्याला अनेकांची तहान भागवत असताना
त्याचे पाणी त्या वेळी खुप गोड होते ना!!

तहानलेली मानसं त्याच्या काठाशी थांबायची
झ-याच त्या पाणी पिऊन आपली तहान भागवायची
काठावर त्याच्या हीरवेगार गवत उगवायचे
झाडांवरच्या फुलांवर रंगिबेरंगी फुलपाखरे भिरभिरायचे

पाहिलय सुर्याचे कीरण झ-यावर पडलेले
त्यातच सप्तरंगांचे दर्शन मला घडलेले
चंद्राच्या प्रकाशात रात्री रूपेरी ते दिसायचे
छोट्याश्या त्याच्या प्रवाहात मासे आनंदाने बागडायचे

एकंदरीत त्याच जीवन खुप आनंदीत होत अन मी ते पाहिलेले होते
पण.....
मानसांनीच केरकचरा अनं कारखान्यातील दुषित पाणी टाकून त्याच निर्मळ असं जिवन दुषित केलं होतं
हे सर्व पाहून मला खुपच वाईट वाटले होते
त्यात, सुर्याने त्याचे प्रखर कीरणं त्यावर टाकून त्याचे जीवनच नष्ट केले होते ...

®ऐश्वर्या सोनवणे (ऐशु)
मुंबई

Dev Chavan