वादळी आला होता तो वारा

Started by Aishu, December 23, 2014, 11:42:37 PM

Previous topic - Next topic

Aishu

वादळी आला होता तो वारा
सोबतीला होत्या पावसाच्याही धारा
पावसात मनसोक्त खेळलो होतो
बरसणा-या  पावसाच्या धारा मुठीत पकडलो होतो

पावसात खुप खुप नाचलेलो होतो
अंगावरील कपड्यांसकट ओलेचिंब भिजलो होतो
वारा हा त्या वेळी खुपच खट्याळ होता
जोरात पळत येऊन पावसाला घेऊन गेला होता

सख्या त्या क्षणी आपण ही असेच केले होते
गच्च पकडून वा-याला ठेवले होते
पाऊस मात्र लपूनच बसला होता
पण,तो ज्या वाटेने गेला होता तेथून पुन्हा आपण त्याला आणला होता..

®ऐश्वर्या सोनवणे(ऐशु)
मुंबई