शोध

Started by शिवाजी सांगळे, December 24, 2014, 12:46:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


शोध

अस्तित्वाच्या खूणा तुझ्या शोधुन आलो
गावात तुझ्या काल फिरून आलो।

दिसशिल कधी ओझरती खिडकीत कुठे
लपवून नजरा न्याहाळून वाटा आलो।

शोधता शोधता कितीदा झाले असे
आठवणीं मध्ये स्वतःला हरवून आलो।

काय झाले? दुरावलो का आपण?
अनुत्तरीत प्रश्न पुन्हा आठवून आलो।

©शिवाजी सांगळ॓

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९