आई तू कुठे आहे?

Started by SHASHIKANT SHANDILE, December 24, 2014, 04:52:08 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

तू कुठे आहे आई मला दिसत का नाही?
झाल्या चुकांसाठी मला रागवत का नाही,
तू कुठे आहे आई मला दिसत का नाही?

रात्री उशिरा पाशिरा जेव्हा घरी गं मी येतो
कान धरून तू माझे मला मारत का नाही
मी बिघडलो कि काय काळजी नाही का गं तुला
चौकशी तर कर जरा करतो काय काय नाही

वाटतं कधी तू चुलीवर भाकर करीत आहे
बघतो त्या अंगणात आता चुलच राहीली नाही
येतांना शाळेतून घरी वाट माझी बघायची
मला बघून प्रेमाची कशी मिठी मारायची

मला मारायची तू गं तू लाड करायची,
त्यावेळी आई माझी किती काळजी करायची
जग सगळा असून आई कमी तुझी गं भासते
लहानपण तुझ्या विना आज व्यर्थचेच वाटते

देवाला विनविले मी अनं प्रार्थना हि केली
तुझे जसे प्रेम आई आजही ना गवसले
तुझी माया तुझा प्रेम आता शोधू तरी कुठे
तुझ्या केल्या गं प्रेमाचे मोल फेळू तरी कसे

तू कुठे आहे आई मला दिसत का नाही?
झाल्या चुकांसाठी मला रागवत का नाही,
तू कुठे आहे आई मला दिसत का नाही?
_ _ _ _ _ _//**_ _
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!