मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो

Started by sanjay limbaji bansode, December 25, 2014, 12:03:39 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

मनुवादाच्या जाळ्यात आजही मी धडपडतो !
मी! . . . . मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो ! !


भूताची भीती . . . . . येता अमावस
संकट येता . . . . .  देवाला नवस
या पासून जरा लांबच राहतो !
मी! . . . .  मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो ! !

जात नाही आता देव शोधण्या दूर
सोडून दिले आता अंगारा अन् शेंदूर
आता मी फक्त बुद्धमं शरणमं बोलतो !
मी! . . . . मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो ! !

नवसाला पावणारा देव
अन् हाकेला धावनारा देव
मी माणसातच शोधतो !
मी! . . . . मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो ! !

लागत नाही आता तंत्र मंत्राच्या नांदी
लांबच राहतो दिसता साधु ढोंगी
मी बुद्धाचा आता छाती ठोकून सांगतो !
मी! . . . . मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो

संजय बनसोडे



Dr. Gitesh


Raj kamble

खुप सुंदर  संजय सर
छान विचार आहेत आपले...
जयभिम





विजय वाठोरे सरसमकर

संजय सर तुमची हि रचना खूपच अप्रतिम आहे .    जय भीम .