खंत ….

Started by AKSHAY BHALGAT, December 26, 2014, 09:49:09 AM

Previous topic - Next topic

AKSHAY BHALGAT

खंत ....

आयुष्यात खंत एवढीच की ,  मी पुढे लढू नाही शकलो ,
सौंदर्याच्या मूर्तीला मी त्या , या हातांनी घडवू नाही शकलो ,...।

अथक परिश्रम घेतले तरीही , एक रूप । एक जीव ... बनवू नाही शकलो ,
ओबड धोबड आकृतीत मी त्या , एक चित्र रंगवू नाही शकलो .... ।

खर तर दगडात मूर्ती असते , त्या मूर्ती मध्ये दगड पाहू  नाही शकलो ,
तिला स्वत: लाच घडायचं नव्हत , हे मी ! जाणवू नाही शकलो ...।

खापर तिच्या अंगावरचे ते ..., दूर मी करू नाही शकलो .,
इतक्या वेदना होऊनही तीस , मी अंगावर त्या घेऊ नाही शकलो ... !

अर्ध भरलेल्या त्या तृप्ती च्या घाग् रीस , मैत्रीच्या मायेने भरू नाही शकलो ... !
मूर्तीतून ओघळणा-या अश्रूंना मी ., या ओंजळीत साठवू नाही शकलो ...

कवितांच्या छन्नीने माझ्या ..., तिच्या गालावर हसू उमटवू नाही शकलो ,
आठवणींच्या सागराने मी त्या , वेडूची तहान भागवू नाही शकलो ...

तरीही धीर नाही सोडला ...  पण मी प्रयत्न करू नाही शकलो ...।
न राहवून सुद्धा मी "तीच " ... मन वासनेतून वळवू नाही शकलो ...

आयुष्यात खंत एवढीच की ,  मी पुढे लढू नाही शकलो ,
सौंदर्याच्या मूर्तीला मी त्या , या हातांनी घडवू नाही शकलो ,...।

अक्षय भळगट..