ते आंब्याचे झाड

Started by sanjay limbaji bansode, December 26, 2014, 06:47:02 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

बघितले त्याने किती उन्हाळे
समोर त्याच्या किती जळाले
उभे  राहुन  पून्हा  गळाले
येउन पून्हा जमिनीत मीळाले
उभा जसा तो स्तब्ध पहाड़
ते आंब्याचे झाड धूऱ्यावर ते आंब्याचे झाड ! !

मालक त्याला आता अनेक
आंबे त्याचे गोड सुरेख !
आंब्याची त्याच्या साऱ्या गोडी
देत असे तो पिढ्यान पिढी !
चाखन्यास पक्षाचीही असे धाड
ते आंब्याचे झाड धूऱ्यावर ते आंब्याचे झाड ! !

पक्षी किलबिल करती तेथे
घरटे करून करती मजे !
वसंत बहरे तिथे निराळा
वसे त्यावरी पोपट,कावळा!
येई वानर ही खादाड
ते आंब्याचे झाड धूऱ्यावर ते आंब्याचे झाड ! !

हिरवळ आता गळत होती
हळूहळू सारी वाळत होती !
ना दिसती आंबे चाखन्या चव
झाला आता तो निर्जीव! 
चोही बाजूस त्याच्या झाल्या आता आड !
ते आंब्याचे झाड धूऱ्यावर ते आंब्याचे झाड ! !

संजय बनसोडे